Hot Posts

6/recent/ticker-posts

आयटी पार्कमध्ये उद्योजकांना १२०० रुपये प्रतिस्क्वेअर मीटर दराने जागा

 आयटी पार्कमध्ये उद्योजकांना १२०० रुपये प्रतिस्क्वेअर मीटर दराने जागा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी तलावाजवळील जलसंपदा विभागाच्या ५० एकरात आयटी पार्क उभारले जाणार आहे. जलसंपदा विभागाची ही जागा 'एमआयडीसी'ला मोफत देण्याचा निर्णय झाला आहे.

त्यामुळे 'आयटी पार्क'साठी उद्योजकांना आता १२०० रुपये प्रतिस्क्वेअर मीटर दराने जागा मिळणार आहे. फेब्रुवारीत जागा उद्योग विभागाकडे हस्तांतरित होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकीची १५ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून दरवर्षी सुमारे सात हजार विद्यार्थी अभियंते होऊन बाहेर पडतात. पण, सोलापूर शहर-जिल्ह्यात त्यांची अपेक्षापूर्ती होईल, अशा संधी नसल्याने दरवर्षी ७० टक्के तरुण अभियंत्यांना सोलापूर सोडावे लागते. या पार्श्वभूमीवर हजारो सोलापूरकर पुणेरी सोलापूरकर झाले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील आयटी पार्कला मंजुरी दिली.आता उद्योग व ऊर्जा विभागाच्या उच्चाधिकारी समितीने जलसंपदा विभागाची जागा आयटी पार्कसाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला. तीन कोटी १६ लाख रुपये शासकीय मूल्यांकन असलेली ५० एकर जमीन विनामूल्य मिळणार असल्याने उद्योजकांसाठी त्याठिकाणी स्वस्तात जमीन उपलब्ध होणार आहे. पूर्वी २३०० रुपये प्रतिस्क्वेअर मीटर दराने मिळणारी जागा आता उद्योजकांना १२०० रुपये दराने मिळेल, असे 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments