अंजली वस्त्रे बनल्या मोहोळ तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अंजली अशोक वस्त्रे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशा नुसार केली गेली असून, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंड यांनी त्यांना अधिकृत निवड पत्र देऊन नियुक्तीची मान्यता दिली आहे.
अंजली वस्त्रे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून मोहोळ शहर व तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी महिला, युवक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध सामाजिक व पक्षीय उपक्रमांद्वारे पक्षाची भक्कम बांधणी केली आहे. त्यांच्या या निष्ठावान कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अंजली वस्त्रे म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मोहोळ शहर व तालुक्यात पक्षीय विचारधारेनुसार काम करण्याची संधी मिळाली. आज ही पदवी मला पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य, गोरगरीब व वंचित जनतेला न्याय देण्यासाठी उपयोगी पडेल. आगामी काळात महिला संघटन अधिक बळकट करण्यावर आणि पक्षवाढीसाठी विशेष भर देणार आहे.”
त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, मोहोळ तालुक्यात महिला काँग्रेस संघटनाला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.png)
0 Comments