Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणी’ योजनेत ई-केवायसीमध्ये त्रुटी; प्रत्यक्ष पडताळणीसाठी आदेश

 लाडक्या बहिणी’ योजनेत ई-केवायसीमध्ये त्रुटी; प्रत्यक्ष पडताळणीसाठी आदेश





मुंबई (कटूसत्य वृत्त) : लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे आढळल्यामुळे आता या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती एक्स या समाज माध्यमावरून दिली.

योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे, लाभार्थी पात्र महिला असावी, आणि तिचा पती सरकारी कर्मचारी नसावा, याची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे.

यावेळी लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाशिमसह राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे अनुदान थांबले होते. यामुळे आता प्रत्यक्ष पडताळणीच्या माध्यमातून या त्रुटी दूर करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments