Hot Posts

6/recent/ticker-posts

वसंत विहार – रस्ते, नाले आणि विकासाचे आश्वासन

 वसंत विहार – रस्ते, नाले आणि विकासाचे आश्वासन


गायत्री नगर, गुलमोहर सोसायटी, संकेत नगर भागातून पदयात्रा; आनंद चंदनशिवे यांचे आश्वासन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
वसंत विहार भागातून बाहेर पडण्यासाठी सध्या स्पर्श हॉस्पिटलसमोरून एकच रस्ता उपलब्ध आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांनी शनिवारी सांगितले की, बलदवा हॉस्पिटल ते अरुणा गॅस एजन्सी मार्ग, पुणे रोड यापर्यंतचा रस्ता विकसित करणे आणि भागातील नाल्याचे रुंदीकरण करणे ही प्राथमिक कामे राहतील.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आनंद चंदनशिवे आणि इतर उमेदवारांनी शनिवारी वसंत विहार, वारद फार्म, मडकी वस्ती, गुलमोहर सोसायटी, संकेत थोबडे नगर, निखिल थोबडे नगर या भागातून पदयात्रा काढली. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना आलेल्या अडचणींवर लक्ष केंद्रीत केले गेले.
चंदनशिवे म्हणाले की, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून वसंत विहार भागात २२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु पुणे रोडशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अजून बाकी आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल. तसेच भागातील नाल्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण करून रहिवाशांना पावसाळ्यातील त्रास टाळला जाईल.
त्याशिवाय, घंटागाडी वेळेवर न येत असल्याच्या तक्रारींवर उपाययोजना केली जाईल. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासोबत बैठक घेऊन या भागात घंटागाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी चंदनशिवे यांनी केली असून, या मागणीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
यावेळी उमेदवार गणेश पुजारी, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे, गौतम चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, उमर शेख, रवींद्र काळे, उमेश रणदिवे, हृदयनाथ मोकाशी, बलवीर तीर्थकर, बिभीषण बाकले, मनोज थोरात, सोमनाथ करंडे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments