मनपा निवडणूक: आठ प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील थेट लढत
२०१७ मध्ये फक्त चार नगरसेवक, आता दोन्ही गटांची कसोटी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट आणि शरद पवार गट आठ प्रभागात थेट आमने-सामने लढत आहेत. २०१७ साली राष्ट्रवादीचे विभाजन झालेले नव्हते आणि त्या वेळी पक्षाचे फक्त चार नगरसेवक निवडून आले होते. आता दोन्ही गटांची कसोटी झाली असून, मनपा निवडणुकीत त्यांना किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने ५४ उमेदवारांना पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत उतारा दिला आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने १२ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने त्या ठिकाणी पुन्हा निर्णय होणार आहे.
प्रमुख प्रभागातील थेट लढती
प्रभाग १ (ड):राकेश सोनी (शरद गट) विरुद्ध सिद्धाराम आनंदकर (अजित गट)
प्रभाग ५ (ब):संपदा खांडेकर (शरद गट) विरुद्ध भाग्यश्री काळे (अजित गट)
प्रभाग ७ (अ): सुमित भोसले (शरद गट) विरुद्ध अनिकेत पिसे (अजित गट)
प्रभाग ७ (ब): मनीषा माने (शरद गट) विरुद्ध मनीषा कणसे (अजित गट)
प्रभाग ८ (अ):नकिब कुरेशी (शरद गट) विरुद्ध उमेर सय्यद (अजित गट)
प्रभाग २० (क): सिद्धार्थ रणधिरे (शरद गट) विरुद्ध अबूबकर सय्यद (अजित गट)
प्रभाग २३ (अ): सुनीता रोटे (शरद गट) विरुद्ध अनिल बनसोडे (अजित गट)
प्रभाग २६ (अ): नागिणी इरकशेट्टी (शरद गट) विरुद्ध किरण सर्वगोड (अजित गट)
या प्रभागांमध्ये दोन्ही गटांमधील थेट लढतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार आणि अनिश्चित होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या कसोटीवर आता सोलापुरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
0 Comments