विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयाचे यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी अविष्कार २०२५ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
शुद्ध विज्ञान या विभागात कु. समीक्षा यरपूल हिने विद्युत वितरण व्यवस्थेमध्ये प्रारंभिक विद्युत प्रवाहातील धक्के कमी करण्यासाठी बुद्धिमान फीडर स्विचिंग प्रणाली या संशोधन प्रकल्पासाठी प्रथम पारितोषिक मिळवले. या प्रकल्पासाठी तिला प्रा. अनंतराव पाटील व प्रा. अनिल कोटमाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विभागात कु. यश राज पाटील याने स्मार्ट कृषी यंत्रमानव या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी तृतीय पारितोषिक पटकावले. समारोप प्रसंगी उद्योजक राम रेड्डी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या प्रकल्पासाठी प्रा. शशिकांत लामकाने, सुमेध पाठक आणि श्रीकांत जगताप यांनी मार्गदर्शन लाभले.
अविष्कार २०२५ या स्पर्धेसाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्रा. सुनील शाखापुरे यांनी समन्वयक म्हणून उत्कृष्ट नियोजन व कार्य केले. या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्राध्यापक वर्ग व सर्व कर्मचारीवृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. भविष्यातही संशोधन, नवोपक्रम व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अशीच भरीव कामगिरी घडावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
.png)
0 Comments