कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे होणार विशेष श्रमसंस्कार शिबिर
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर वागदरी येथे सोमवार दिनांक 5 जानेवारी ते रविवार दिनांक 11 जानेवारी पर्यंत होणार आहे.
विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी करणार असून यावेळी अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, याशिवाय संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसूती, पंकज सुतार, राजेंद्र बंदीछोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच शिवानंद घोळसगाव हे भूषविणार आहेत.
सात दिवसाच्या शिबिरात श्रमदान, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिबिरामध्ये दि.6 जानेवारी दु.3 वा. जलसंधारण व्यवस्थापन विषयावर कृषी सहाय्यक आनंद कांबळे हे व्याख्यान देणार आहेत, राजशेखर निंबाळे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दि. 7 जानेवारी दु.3 वा. महिलांच्या जीवनातील बदलते स्वरूप आव्हाने व उपाय यावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादात मैंदर्गी नगर परिषदेच्या नुतन नगरसेविका सुरेखा होळीकट्टी, पुनम कोकळगी, रूपाली शहा सहभागी होणार आहेत, सौ शांभवीताई कल्याणशेट्टी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर दि. 8 जानेवारी दु.3 वा. शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका या विषयावर कृषी अधिकारी सुशील पाटील विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी शांतेश्वर कोठे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालय वागदरी यांच्या विद्यमाने मुला- मुलींची रक्तगट तपासणी होणार आहे. तसेच दि. 9 जानेवारी दु.3 वा. भारुड, सांस्कृतिक कार्यक्रम, आदींचे आयोजन करण्यात आले आहे .
दि. 11 जानेवारी स.10 वा. या शिबिराच्या समारोपासाठी अक्कलकोट नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवानंद घोळसगाव, प्रदीप पाटील, बापूराव चव्हाण हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान काळात शिबिर कार्याची पाहणी करण्यासाठी प्र कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, डॉ राजेंद्र वडजे, डॉ विरभद्र दंडे हे सदिच्छा भेट देणार आहेत.
श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे प्रयत्न करत आहेत.
0 Comments