वीरतपस्वी शिक्षण संकुल येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वीरतपस्वी शिक्षण संकुल विडी घरकुल, कुंभारी येथे मुख्याध्यापक अमोघ सिद्ध कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिकचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन पाटील होते. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय सुतार यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून सांगितला. तर ज्येष्ठ शिक्षक पंचया स्वामी व वैशाली डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. प्रास्ताविक लक्ष्मी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मोनिका माळगे तर अश्विनी पडनूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक- शिक्षिक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
.png)
0 Comments