नेताजी खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ
बोरामणी (कटूसत्य वृत्त):- नेताजी खंडागळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच त्यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्यावर आधारित कॅलेंडरचे अनावरण मोठ्या उत्साहात व जनसहभागातून पार पडले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेशदादा बिराजदार, सरपंच राज साळुंखे, सोसायटी चेअरमन भारत कवडे, सोसायटी चेअरमन वजीर मुजावर, माजी सरपंच राजू हलसगे, कमलाकर भोसले, लहुजी सेना अध्यक्ष सुधाकर पाटोळे, माजी सरपंच माणिक नन्नवरे, किसन मस्के, लक्ष्मण जाधव, नागनाथ बिराजदार, अतुल कवडे, मल्लिनाथ पटणे, नितीन माशाळे, दिलीप आचलारे, अभिमन्यू भगरे, वैभव हलसगे, नाना भोसले, रतन शिंदे, विलास वाघमारे, अतुल आवटे, माऊली वाघमारे, गौतम गायकवाड, बालाजी पवार, संजय पवार, अमित मोरे, संजय पाटील, विशाल शिंदे, नागेश सुरवसे, उपसरपंच हणमंत सरडे, नितीन मोहिते, संतोष स्वामी यांच्यासह माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच बोरामणी–मुस्ती, उळे–कासेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी नेताजी खंडागळे यांच्या सामाजिक बांधिलकीचे, लोकाभिमुख कार्याचे व विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी तसेच विकासाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी अनावरण करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये नेताजी खंडागळे यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कामांचा आढावा देण्यात आला असून, त्यातून त्यांच्या कार्याची दिशा व ध्येय स्पष्टपणे दिसून येते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व लोकसहभागातून पार पडला.
.png)
0 Comments