सर्जनशील माध्यमातून मतदान जनजागृती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर “प्रत्येक मताचे महत्त्व” नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्जनशील व लोकसहभागात्मक पद्धतीने विविध मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या एन.यू.एल.एम. (National Urban Livelihoods Mission) अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रमांमध्ये ६०० महिला बचत गट सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.शहरातील २५ प्रमुख ठिकाणी बैठका, संवाद सत्रे, जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना मतदानाचा हक्क, त्याचे महत्त्व तसेच लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांदरम्यान उपस्थित महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात येऊन त्यांनी इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा संकल्प केला. महिला बचत गटांच्या सशक्त सहभागामुळे मतदान जनजागृतीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यास हे उपक्रम मोलाचे ठरणार आहेत, असा विश्वास सोलापूर महानगरपालिकेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे विविध माध्यमातून मतदान जनजागृती चे काम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी ,
वार - गुरुवार रोजी
वेळ - सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
सोलापूरकरांनी शंभर टक्के मतदान करण्याचे व आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावणीचे आवाहन डॉ. सचिन ओम्बासे. आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांनी केले आहे.
.png)
0 Comments