क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती माळीनगर येथे उत्साहात साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती माळीनगर येथे शनिवारी सकाळी १० वा.विविध संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या विश्रामगृहा समोरील क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास साखर कारखान्याच्या नूतन इंडिपेंडेंट डायरेक्टर किशोरी चवरे व शिक्षिका सविता पांढरे,वैशाली पांढरे,सुप्रिया झगडे,वैशाली बनकर,निशा दळवी, सुवर्णा पोळ,मेघा जोशी,आशा रानमाळ, सुखदा विधाते,कीर्तीमाला पांढरे, संध्याराणी दुनाखे, सपना भेंडीगिरी,सौ.लोखंडे व उपस्थित महिला व मुलींच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे,संचालक राहुल गिरमे,मोहन लांडे,विशाल जाधव, मुरलीधर राऊत,शुगरकेन सोसायटीचे व्हा.चेअरमन कपिल भोंगळे, संचालक जयवंत चौरे,नामदेव आगम,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,म.फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे,कृष्णा भजनावळे,भागधारक गौतम गिरमे,मिलिंद गिरमे,घनश्याम भोंगळे,अनिल झगडे,निलेश एकतपुरे,मॉडेल हायस्कुलचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,माजी प्राचार्य प्रकाश चवरे,माहिती व जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर,एज्युकेशन सोसायटीचे सर्व विभागाचे शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी तसेच सर्व समाज बांधव,व्यापारी वर्ग,कारखान्याचे सभासद,भागधारक,शेतकरी,अधिकारी वर्ग,खाते प्रमुख व कर्मचारी,ग्रामस्थ आणि माळीनगरच्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे वतीने उपस्थित महिला व मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील पुस्तके वाटण्यात आली.
.png)
0 Comments