अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने शिवतीर्थ आखाङा शंकरनगर -अकलूज येथे दिनांक १२,१३ व १४ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन
केले आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक व स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील प्रमूख उपस्थित होते.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपारांणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या स्पर्धा संपन्न होत आहेत.
सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले, स्पर्धेचे हे ४७ वे वर्ष आहे.स्पर्धेत महाराष्ट्रासह परराज्यातील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी होतात. सुमारे ७५० पेक्षा अधिक मल्ल यावर्षी स्पर्धेत सहभागी होतील. ञिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटाकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख रुपये, तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहे. तर वजनी गटासाठी २५ ते ८५ किलो पर्यंत एकूण १५ गटानुसार विजेत्या व पराजित मल्लांनाही भव्य बक्षीस दिली जातात. वसंतराव जाधव म्हणाले, दि.१२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मल्लांनी आपली वजने शिवतिर्थ आखाड्यात द्यावीत.दि१२ रोजी सायंकाळी ४ वाजता समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ. उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या वेळी प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, अरविंद वाघमोडे, दादासाहेब कोकाटे, उमेश भिंगे, बाळासाहेब सावंत, रामचंद्र मिसाळ, सुहास थोरात, सतीश शेखर आदी मान्यवर उपस्थित होते.
.png)
0 Comments