Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्रकारांची भूमिका समाजाला दिशा देणारी वास्तव मांडणारी- राजकुमार हिवरकर

 पत्रकारांची भूमिका समाजाला दिशा देणारी वास्तव मांडणारी- राजकुमार हिवरकर




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माणसाला सन्मानपूर्वक जगण्यासाठी पत्रकार आणि त्यांची लेखणी यांची भूमिका कायमच अग्रभागी राहिली आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात त्यामुळे पत्रकाराची भूमिका समाजाला दिशा देणारी वास्तव मांडणारी असल्याचे मत शिवसेना ओबीसीचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील शिवसेना भवन या ठिकाणी शिवसेना जिल्हा ओबीसी विभाग, राजगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, राजगड नॉलेज सिटी यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते. यावेळी राजगडचे व्हाईस चेअरमन शैलेश दोशी, संचालक रोनक चकेश्वरा, दर्शन गांधी, किशोर लोणारी, धनंजय हिवरकर, शंकर शिंगाडे, मॅनेजर तुषार मिटकरी महात्मा फुले दूधडेरीचे चेअरमन रणजीत जठार,
भाजपचे एकनाथ ननवरे, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ६ चे प्रमुख सनी बरडकर, गटनेते दादाभाई मुलlनी, रणजीत हिवरकर पाटील,  प्रभाग १३ चे प्रमुख राजू मुलांनी, भाजपाचे मनोज जाधव, सुनील बनकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिंदे गट शिवसेनेचे ओबीसी चे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व पत्रकारांचे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक, राजगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व राजगड नॉलेज सिटीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments