Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्य निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी

 मुख्य निवडणूक निरीक्षक यांची नॉर्थकोट प्रशाला येथे पाहणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज मा. मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती नयना गुंडे (आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे)तसेच मा. निवडणूक निरीक्षक मलिकार्जून माने (अपर जिल्हाधिकारी, सातारा) यांनी सोलापूर शहरातील नॉर्थकोट प्रशाला येथे स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ७ यांच्या कार्यालयांना तसेच आचारसंहिता कक्षास भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या पाहणीदरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत माहिती घेण्यात आली. नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, निवडणूक साहित्य व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा, कार्यालयीन नोंदी व दैनंदिन अहवाल प्रणाली यांची तपासणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सह.आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सौ. सारिका अक्कूलवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी मतदान केंद्र ची पहाणी सुद्धा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या मा. निरीक्षकांनी निवडणूक यंत्रणेची तयारी, उपलब्ध सुविधा व समन्वयाबाबत समाधान व्यक्त केले. आगामी निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व पूर्णपणे निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करावे, असे निर्देश देण्यात आले.सोलापूर महानगरपालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments