Hot Posts

6/recent/ticker-posts

वर्षाआरंभा निमित्त अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन

 वर्षाआरंभा निमित्त अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- वर्षाआरंभा निमित्त अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक आलेले होते. अन्नछत्र न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. न्यासाकडून अन्नदानाची वेळ वाढविली होती.

 अन्नछत्र मंडळात  दिवसात १ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.वर्षीआरंभी भाविकांच्या गर्दीने  सवोंउच्चांक गाठला आहे.

चौकट :
न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.

Reactions

Post a Comment

0 Comments