राजराजेश्वरी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम सेवानिवृत प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. माता पालक संघाच्या सदस्या शितल पवार, पालक शिक्षक संघाचे सदस्य शिवहार गाढवे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार ,माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी आदी उपस्थित होते.यावेळी संविधान प्रास्ताविक, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीतानंतर देशभक्तीगीतांवर संगीतमय कवायत घेण्यात आले. राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचे विद्यार्थिनीनी 'हिंद देश के निवासी'व तिसरीच्या विद्यार्थीनी 'नन्ना मुन्ना राही हु' हे देशभक्तीपर गीत सहवाद्य सादर केले. यावेळी स्वराली देवरनादगी, शिवराज लाच्यण, भाग्यश्री गाढवे, श्रद्धा बाकळे, चैत्राली हणमगोंडा आदी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले.यावेळी असाक्षर मुक्त गावाची शपथ, साक्षरता शपथ घेण्यात आले. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांना आपण भारताचे एक जबाबदार नागरिक आहोत याची जाणिव ठेवून देशसेवा करण्याचे आवाहन केले.मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लाडू खाऊ वाटप करण्यात आले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला भांड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

0 Comments