Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्राथमिक शाळेत नेताजी जयंती साजरी

 नेताजी प्राथमिक शाळेत नेताजी जयंती साजरी 



सोलापूर (कटूसत्य वृत्त ):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष पुजारी व माता पालक संघाच्या सदस्या भाग्यश्री बंदलगी आदी उपस्थित होते.
प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समर्थ आलुरे, आदित्य बंबाटक्के, राधिका सावळे, समृद्धी पटणे, रिषिता मासपत्री, अस्मिता पुठ्ठा, रितिका हलकुडे, त्रिशा साका, श्रेया लांडगे, कृतिका सुतार, अक्षरा पसूल, सानवी म्हेत्रे,स्वरा आडम, श्रेया काटमोरे, धनश्री कलशेट्टी, अक्षर वड्डेपल्ली आदी विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्या विषयी माहिती सांगितले.यावेळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी विजयालक्ष्मी कुंभार म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. देशासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांचे नाव आपल्या शाळेला आहे. हि बाब आपल्यासाठी गौरवास्पद आहे. त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक जगदेव गवसने यांनी केले तर प्रशांत बत्तुल यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments