वाहतुकीचे नियम सर्वांच्या हिताचे पालन करणे गरजेचे- महारुद्र परजणे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे असून, प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले.
ते नातेपुते पोलीस ठाणे कर्मचारी, पोलीस पाटील व एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे आरएसपीचे विद्यार्थी यांनी नातेपुते शहरात रस्ता सुरक्षा सत्ता नमित्त काढण्यात आलेल्या रॅली प्रसंगीच्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाली की, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम समजून घेत स्वतःमध्ये शिस्त लावून घेतली पाहिजे. नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक नियमांचे पालन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. अपघात झाल्यास नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करावी. रस्ते अपघात विरहित राहतील यांची दक्षता सर्व यंत्रणेने घ्यावी. प्रत्येकाने सतर्क, जागरूक राहत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले केले पाहिजे असल्याचेही मत नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी नागरिकांना व वाहनचालकांना केले. नातेपुते पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच नातेपुते येथील एस. एन. डी. सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथून नातेपुते शहरातील मेन मेन चौकामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रॅली काढून नियम पाळा अपघात टाळा वेगावर नियंत्रण जीवन सुरक्षित अशा घोषणा देत अपघात न होऊ नये यासाठी जनजागृती केली. यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज राऊत, गोपनीय विभागाचे अमोल देशमुख, वाहतूक सुरक्षा यंत्रणेचे रमेश बोराटे राकेश राव, वर्षा गुळीग, पोलीस पाटील औदुंबर बुधावले तसेच नातेपुते परिसरातील सर्व पोलीस पाटील व एस एन डी सीबीएससी स्कूलचे विद्यार्थी रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये सहभागी झाले होते.
चौकटीत :
रस्ते अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनांचा अतिवेग त्यामुळे वाहनांचा अतिवेक कमी केल्यास अनेक अपघात टळू शकतात, दुसरे कारण ओव्हरटेक करण्याची स्पर्धा यामध्ये स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकू नका, वाहनाने प्रवास करणारे असो किंवा पादचारी असो रस्ता एकेरी असो किंवा दुहेरी रस्त्याच्या डाव्या बाजूने प्रवास करणे सक्तीचे असते, वाहन वळवताना इंडिकेटर करा त्यानंतर दिशा बदला, दारू पिऊन गाडी चालवणे अपघाताला आमंत्रण आहे त्यामुळे कोणतेही परिस्थितीत दारू पिऊन गाडी चालवू नये, गाडी चालवत असताना फोनचा वापर कमी करा वाहन रोडच्या साईटला घेऊन मोबाईलवर बोला, वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवा समोरील वाहनाने ब्रेक मारल्यास अपघात होणार नाही, गरज असल्यास गाडीचा हॉर्न वाजवा विनाकारण गर्दीच्या ठिकाणी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नका, जर हे वाहतुकीचे नियम वाहनधारकाने पाळले पालन केले तर आपल्याला सुरक्षित प्रवास अनुभवता येईल
महारूद्र परजणे ( सपोनि नातेपुते पोलीस ठाणे )
.jpg)
0 Comments