Hot Posts

6/recent/ticker-posts

६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात

 ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ उमेदवार तर १३६ पंचायत समिती गणांसाठी ४८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

अन्य पक्षांनी मात्र ताकद जिथे आहे, त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. याशिवाय सांगोला तालुक्यात शेकाप, पंढरपूर व करमाळा तालुक्यात स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात तीन गटांसाठी १४ तर ६ गणांसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बीबीदारफळ गटात सर्वाधिक चार तर कोंडी व नान्नज गटात प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात आहेत. मोहोळ तालुक्यातील सहा गटांत २५ उमेदवार तर १२ पंचायत समिती गणांत ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

यामध्ये नरखेड, पेनूर व कुरुल गटात प्रत्येकी ५ तर कामती बु. व आष्टी गटात प्रत्येकी ३ तर पोखरापूर गटात ४ उमेदवार रिंगणात आहेत. आष्टी गणात ४, खंडाळी ३, नरखेड ४, शिरापूर ३, सावळेश्वर ३, कामती बु. ४, सय्यद वरवडे ४, पोखरापूर ४, पेनूर ३, टाकळी सिकंदर ३, कुरुल व घोडेश्वर प्रत्येकी तीन असे एकूण ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पंढरपूर तालुक्यातील ८ गटांतून ४७ उमेदवार तर १६ गणांतून ७० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. गोपाळपूर ५, वाखरी ८, करकंब ८, भाळवणी २, रोपळे ६, भोसे ३, टाकळी ९, कासेगाव ५ असे एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील चार गटांमध्ये १३ उमेदवार तर ८ गणांत २५ उमेदवार आहेत. हुलजंती गटात २, संत दामाजीनगर गटात ३, लक्ष्मी दहिवडी गटात ५, भोसे गटात ३ उमेदवार रिंगणात आहेत. संत दामाजीनगर गणात २, बोराळे गणात ३, हुलजंती गणात २, मरवडे गणात ३, संत चोखामेळानगर गणात २, लक्ष्मी दहिवडी गणात ७, भोसे गणात ३ तर रड्डे गणात ३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

माळशिरस तालुक्यातील ९ गटांतून ३० उमेदवार तर १८ गणांतून ५४ उमेदवार रिंगणात आहेत. दहिगाव गटात ४, मांडवे ३, फोंडशिरस ३, संग्रामनगर २, माळीनगर ४, बोरगाव ५, वेळापूर २, निमगाव ४, पिलीव ४ असे एकूण ३० जण रिंगणात आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटात ६, कुंभारी ४,वळसंग ५, हत्तूर ४, मंद्रूप ४, भंडारकवठे ५ असे एकूण २८ तर कासेगाव गणात ६, बोरामणी ४, कुंभारी ५, धोत्री ३, वळसंग ४, होटगी ७, हत्तूर ५, औराद ५, मंद्रूप ५, कंदलगाव ३, भंडारकवठे २, निंबर्गी ३ असे एकूण ५२ उमेदवार रिंगणात आहेत.

मातब्बरांनी घेतली निवडणुकीतून माघार

जिल्हा परिषद निवडणुकीत मातब्बर उमेदवारांनी माघार घेत, लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोर्टी गटातून सविताराजे भोसले, हत्तूर गटातून इंदुमती अलगोंडा-पाटील, मानेगाव गटातून दादासाहेब साठे, फोंडशिरस गटातून वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, विमल जानकर यांनी अर्ज माघार घेतला आहे. पण वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांचा यशवंतनगर गणात अर्ज कायम आहे. मंगळवेढा तालुक्यात सिद्धेश्वर आवताडे यांनी संत दामाजीनगर, भोसे या जिल्हा परिषद गट व लक्ष्मी दहिवडी या गणातून अर्ज माघार घेतला आहे. माजी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी लक्ष्मी दहिवडी गटातून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments