Hot Posts

6/recent/ticker-posts

पवार, साठे, लामकाने, शिलवंत यांचे उमेदवारी अर्ज दाखल

 पवार, साठे, लामकाने, शिलवंत यांचे उमेदवारी अर्ज दाखल




उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी उत्तर सोलापूर तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून इंद्रजीत पवार आणि पंचायत समिती गणातून सुनिता अरुण बारसकर यांनी मंगळवारी उत्तर तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी माजी आमदार दिलीप माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, विकास सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील जाधव, संभाजी दडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याच दिवशी बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बळीराम साठे यांनी, पंचायत समिती गणातून अंबिका लामकाने, तेजस्वी बोराडे, वैशाली शिलवंत, अनिल माळी, प्रकाश चोरेकर, काजल जगताप-गायकवाड यांनीही अर्ज दाखल केले. बळीराम साठे यांच्या सोबत राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे-खेलबुडे, उद्योगपती प्रल्हाद काशीद, अण्णू मार्तंडे, मनोज साठे, नागेश पवार आणि सुभाष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगळवारी उत्तर तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी ८ तर पंचायत समितीसाठी ८ अशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी ९५ आणि पंचायत समिती गणासाठी १४१ असे एकूण २३६ उमेदवारी अर्ज विक्री झाल्याचे उत्तर निवडणूक तहसील कार्यालयाने कळवले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २१ जानेवारी आहे. २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी होईल तर २७ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
Reactions

Post a Comment

0 Comments