Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी–शिवसेना युतीची भव्य पदयात्र्यांने भाजप उमेदवारांत धडकी

 राष्ट्रवादी–शिवसेना युतीची भव्य पदयात्र्यांने भाजप उमेदवारांत धडकी






“सेवा, शिक्षण आणि संवेदनशीलतेच्या जोरावर प्रभागाचा विकास साधणार” सी. ए. सुशील बंदपट्टे यांचा मतदारांशी थेट संवाद

‘कामाचा माणूस, आपला माणूस’च्या घोषणांनी प्रभाग ४ दणाणला

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली विकासात्मक व सामाजिक भूमिका ठामपणे मांडली. सेवा, शिक्षण आणि संवेदनशीलतेच्या जोरावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांनी काढलेल्या भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे. या पदयात्रेतील प्रचंड लोकसहभाग आणि शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शन पाहून भाजपच्या उमेदवारांमध्ये धडकी भरल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सी. ए. सुशील चंदू बंदपट्टे, सारिका विवेक फुटाणे व विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी ठिकठिकाणी मतदारांनी औक्षण करून स्वगत केले.

ही पदयात्रा बाळीवेस बुधले गल्ली, तुळजापूर वेस, मंगळवार पेठ पोलीस चौक, भुसार गल्ली, कुंभार वेस, क्षत्रिय गल्ली, कौतंम चौक, मधला मारुती, टिळक चौक, कस्तुरबा मार्केट, बारामीर चौक, शिवगंगा मंदिर, डिके ऑफिस, बाळीवेस चौक, महमाने चाळ, लाडका गणपती, जम्मा वस्ती, भिमाई चौक, हनुमान नगर, खोलवा रस्ता, बॉबी चौक, श्राविका शाळा, दमानी शाळा, स्वीपर कॉलनी, वडार गल्ली, लक्ष्मण महाराज पुतळा आदी मार्गांवरून मार्गक्रमण करत आनंद दादा चंदनशिवे यांच्या कार्यालयाजवळ सांगता झाली.

पदयात्रेदरम्यान “कामाचा माणूस, आपला माणूस” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित, संवेदनशील आणि संविधाननिष्ठ नेतृत्वाची गरज असल्याचे मत युतीच्या उमेदवारांनी व्यक्त केले.

या पदयात्रेत युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती, महिला तसेच विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी–शिवसेना युतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

चौकट १
सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी देशातील अत्यंत कठीण मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या कर्तृत्वाची सुरुवात केली. गेल्या वीस वर्षांत त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने सेवाभावी कार्य केले आहे.

सोलापूरमधील बाळीवेस, यल्लेश्वरवाडी येथे वडार समाजाच्या श्री अय्या गणपतीच्या २१ फूट उंच भव्य मूर्ती व मंदिर उभारणीचे कार्य बंदपट्टे कुटुंबाने केले असून, त्यातून सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोखा अधोरेखित झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज अडचणीत असताना चंद्रनील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो गरजू नागरिकांना मोफत धान्य, जीवनावश्यक वस्तू आणि जनता भोजनाचे डबे वितरित करण्यात आले. त्या संकटसमयी बंदपट्टे कुटुंब अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरले.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याच्या भूमिकेतून दरवर्षी प्रभागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्याचा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. याशिवाय निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करून अनेक कुटुंबांना त्यांनी आधार दिला आहे. कोणताही गाजावाजा न करता निस्वार्थ भावनेने काम करणे हीच बंदपट्टे कुटुंबाची ओळख असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

OBC प्रवर्गातून निवडणूक लढवणारे सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी, “आपले एक मत अनेक कुटुंबांची आशा आणि आधार ठरू शकते. चांगल्या माणसांना संधी दिली, तर चांगले काम निश्चित घडते,” असे मतदारांना आवाहन केले.

चौकट २
सेवा आणि माणुसकीचा वसा जपणारे नेतृत्व : विश्वनाथ दत्तात्रय बिडवे
 सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी करणारे विश्वनाथ दत्तात्रय बिडवे हे सुशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून नागरिकांमध्ये ओळखले जातात. बी.कॉम. पदवीधर असलेले बिडवे गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटिंग क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, मागील २५ वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध डुल्या गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी गरजू नागरिकांना मदत, सामाजिक उपक्रम, धार्मिक सण सामाजिक बांधिलकीने साजरे करणे आणि युवकांना सकारात्मक दिशेने प्रवृत्त करणे अशा अनेक उल्लेखनीय उपक्रमांचे नेतृत्व केले आहे. लोकांच्या अडी-अडचणीला धावून जाणे, मदत मागणाऱ्यांकडे कोण आहेस यापेक्षा काय अडचण आहे हे विचारणे हीच त्यांची खरी ओळख आहे.

विश्वनाथ बिडवे यांची मोठी ताकद म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेला निःस्वार्थ मित्रपरिवार. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीची नाती जपणारे बिडवे मित्रांसाठी उभे राहतात आणि मित्रही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर सेवा करण्याचे माध्यम आहे, या भूमिकेतून ते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.

“शब्द नव्हे काम करणारा, आश्वासन नव्हे प्रत्यक्ष मदत करणारा” असे नेतृत्व प्रभाग क्रमांक ४ साठी आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

चौकट ३
सारिका विवेक फुटाणे शिक्षण बी. ए. झाले असुन यांचा जन्म वारकरी संप्रदायाची दीर्घ परंपरा लाभलेल्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच घरातील कीर्तन, भजन, भागवतधर्म आणि भक्तीमय वातावरणामुळे त्यांच्यावर संस्कारांची मजबूत पायाभरणी झाली. सेवा, करुणा आणि समाजाबद्दलची बांधिलकी हेच त्यांच्या जीवनाचे मूल्य बनले. सामाजिक व राजकीय वारसा लाभलेल्या फुटाणे कुटुंबात सून म्हणून प्रवेश केल्यानंतर, त्यांनी या वारशाला केवळ जपले नाही तर तो अधिक व्यापक केला. महिलांना एकत्र आणून सामाजिक व धार्मिक कार्याची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने त्यांनी 'शिवालय भजनी मंडळा' ची स्थापना केली. या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी बहुमूल्य योगदान दिले. समाजसेविका लताताई फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करताना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ जवळपास ८०० महिलांना मिळवून देत त्यांना धुरमुक्त व सुरक्षित स्वयंपाकाची सुविधा मिळवून दिली. या भागातील हजारो महिलांना 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळवून देत आर्थिक आधार दिला. बांधकाम कामगार योजनेचे लाभ अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले. आरोग्य हेच खरे धन मानून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून ८० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ९०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करून दृष्टीदानाचे कार्य केले. या भागात ४० बचत गटची बांधणी करून शासनाच्या मार्फत सर्व महिलांना व्यवसायासाठी ३ कोटी हून अधिक कर्ज देण्यात आले. सारिकाताई फुटाणे या केवळ उमेदवार नसून, त्या महिलांची आधारवड, गरिबांचा आवाज आणि समाजाच्या हितासाठी सातत्याने काम करणारी सेवाभावी नेतृत्व आहेत. विकास, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय हेच त्यांचे ध्येय आहे. सेवा, संस्कार आणि संवेदनशीलतेचे नेतृत्व.

चौकट ४
कविता आनंद चंदनशिवे या सामाजिक जाणीव असलेले सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्र ४ मधून अनुसूचित महिला अ गटातून उभ्या आहेत. कविताताई आनंद चंदनशिवे या सोलापूर महानगरपालिकेतील लोकप्रिय नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे यांच्या धर्मपत्नी असून स्वतःच्या स्वतंत्र सामाजिक ओळखीने त्या परिचित आहेत. कविताताई चंदनशिवे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड असून आनंद दादा चंदनशिवे यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय सहभाग घेतात. सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन गरजू कुटुंबांशी थेट संपर्कात असतात महिलांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता आणि प्रत्यक्ष काम हीच त्यांची ओळख आहे. महिला बचत गटांचे संघटन व मार्गदर्शन स्वावलंबनासाठी महिलांना प्रोत्साहन अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्याचे कार्य करतात महिलांच्या आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत पद, प्रसिद्धी किंवा राजकारणापेक्षा माणुसकी, संवाद आणि सहकार्य यांना त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. महिलांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी, त्यांच्या अडी-अडचणी ऐकून घेणारी आणि योग्य मार्गदर्शन करणारी हीच कविता चंदनशिवे यांची खरी ओळख आहे. महिलांच्या प्रश्नांना समजून घेणारी, सोबत उभी राहणारी, संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजेच...!

Reactions

Post a Comment

0 Comments