Hot Posts

6/recent/ticker-posts

नवी मुंबई येथे सावित्रीमाई जयंतीदिनी समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक ढोक झाले सन्मानित

 नवी मुंबई येथे सावित्रीमाई जयंतीदिनी  समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक  ढोक  झाले सन्मानित  





 मुंबई /कळंबोली  – श्री .संत सावतामाळी समाज विकास मंडळकळंबोलीनवी मुंबईचे वतीने  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त सत्यशोधक चळवळीचे पुणे येथील कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीमहाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांचे शुभहस्ते शनिवार दि.जानेवारी 2026 रोजी सायंकाळी वाजता  न्यू सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या भव्य ग्राऊंडवर मोमेंटो शाल श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात  आला. हा सन्मान करताना त्यांची पत्नी सत्यशोधिका आशा ढोक यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला.

यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे कार्याध्यक्ष बापू भुजबळउपमुख्यमंत्री स्वीकीय सहाय्यक धीरज अभंग ,फॉरेन्स लॅब पुणे चे अधिकारी विशाल पांढरे वर्ल्ड बँक मंत्रालय चे व्यवस्थापक प्रवीण वानखेडे वक्त्या मोनिका काळेसावता महाराज वंशज रविकांत वसेकर महाराजप्रभु महाराज माळीजे. के.कुदळे,उपस्थितीत होते .

 

सत्यशोधक रघुनाथ ढोक हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धामुहूर्तकर्मकांड आणि जातीभेदापलीकडे  जावून गेली गेली 34 वर्षे सत्यशोधक विवाहगृहप्रवेश तसेच जाती निर्मलून साठी जात विरहीत कामकाज विनामूल्य करीत असतात त्यांचे कार्य महाराष्टपुरते सिमित नसून ते तेलंगणाराजस्थान हरियाणामध्यप्रदेशउत्तरप्रदेशदिल्लीआग्रा,सोबत  नेपाळ देशात देखील सत्यशोधक चळवळीचे कार्य करीत अनेक पुरस्कार मिळविले आहेत.त्यांनी अनेक महापुर्षांवर  विविध भाषेत पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते नोकरी करीत समाजकार्य करीत आहे म्हणून आज आम्ही समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करीत असल्याचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी मंचावरून माहिती दिली.

 

सत्कारास उत्तर देताना ढोक म्हणाले की थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवताना मी फक्त एक वसा सत्यशोधक चळवळीचा धागा म्हणून पुढे नेला तर एवढा सन्मान सर्वत्र होतो आहे तर मग फुले दांपत्य यांनी 18 व्या शतकात विविध प्रकारचे केलेले क्रांतिकारी कार्य व त्यांचे विचार आणि सोबत गुलामगिरीशेतकऱ्याचा आसूडअर्धांग वायू झाला असताना देखील लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ  व इतर अनेक ग्रंथ लिहून अलौकिक केलेले कार्य आणि विशेष म्हणजे भारताचे संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरू मानतात याचा अर्थ ते किती महान होते याचा सर्वांनी विचार करावा.त्यांनी अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचे कृतिशील विचार ,कार्य पुढे नेऊन फुले दांपत्याचा सन्मान करू या असे देखील ढोक यांनी प्रतिपादन केले.

 

आमदार प्रशांत ठाकूर प्रतिपादन करताना म्हणाले की गेली 18 वर्ष हे समाज मंडळ दरवर्षी भरगच्च कार्यक्रम घेत असून गुणवंत विद्यार्थी सोबत विविध प्रकारचे कार्य करणारे महिला पुरुषांचा सन्मान करून त्यांना व इतरांना प्रेरणा देण्यासाठी मदत करीत आहेत असे गौरवदगार काढीत लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर मंडळासाठी भुखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र मोकल,प्रास्ताविकस्वागत ॲड.श्रीनिवास क्षीरसागर  आणि आभार अध्यक्ष नितीन जाधव यांनी मानले सोहळा,ग्रंथ दिंडीभव्य मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उद्धवराव भुजबळ,सतीश आणि बाबा ढोक  ,नवनाथ घनवट,शंकर हजारेनाळे क्लासेस,कामोठे,श्री.धनलक्ष्मी महिला गृह उद्योग तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद यांनी मोलाची मदत केली तर यावेळी खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

 


Reactions

Post a Comment

0 Comments