महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
नाशिक (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये याप्रसंगी मा. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. राजरतन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनास उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रगीतानतंर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत.

0 Comments