Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्मवीर जयंती निमित्त रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 कर्मवीर जयंती निमित्त रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयांमध्ये  जगदाळे मामा यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. गलांडे पी.आर .कार्यालयीन अधीक्षक मोरे टी. एस. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शेंडे एस. एस., प्रा.कुलकर्णी, प्रा. बोनगे व्ही. ई., डॉ. रनणनवरे, प्रा.जा यभाय एम. बी .प्रा. जाधव जी.व्ही. प्रा. गुरव एम.डी. , प्रा. शेळके एस. एम., प्रा. आदलिंगे ए. आर. व आदी कर्मचारी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments