Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात उमेदवारांचे अर्ज दाखल

 आ. अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वात उमेदवारांचे अर्ज दाखल



 



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. विकासाला प्राधान्य देणारे, सर्वसामान्य जनतेशी जोडलेले उमेदवार आम्ही दिले आहेत. युतीबाबत आमदार भालके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच योग्य तो निर्णय होईल.”
जिल्हा परिषद गट – राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार- 1. करकंब – बाळासाहेब मारूती देशमुख, श्रद्धा अमोल शेळके, 2. भोसे – शन्मुखी भारत कोरके, सारिका संजय कोरके,3.रोपळे – गितांजली हनमंत साळुंखे, सावली अतुल गायकवाड,4. वाखरी – मयुरी संतोष बागल, शिला सूर्यकांत बागल,5.भाळवणी – सुप्रिया सुनील गायकवाड, अनिता प्रदीप लोखंडे,6.लक्ष्मी टाकळी – शत्रुघ्न दगडू रणदिवे, मल्हारी श्रीधर फाळके
पंचायत समिती गण – उमेदवारांची यादी-उंबरे– शहाजी माणिक मुळे, कल्याणी शहाजी मुळे, करकंब – श्रद्धा अमोल शेळके, धनंजय मोहन गुळमे, भोसे – भाग्यश्री आण्णा भुसनर, समता काकासाहेब पवार,
गुरसाळे – महादेव आण्णा पाटील, अतुल सत्यवान गायकवाड, रोपळे– जाईताई दिलीप कोरके, विजया विलास भोसले, सुस्ते– सावली अतुल गायकवाड, गितांजली हनमंत साळुंखे,पुळूज– वर्षाराणी भिवा शेंडगे,
गोपाळपूर – तारामती शरद मोरे, अमृता अमोल पाटील, वाखरी – आण्णा बलभीम भुसनर, शिवाजी तात्या मदने, पटवर्धन कुरोली– प्रमिला सोमनाथ झांबरे, दिपाली सागर नाईकनवरे, भाळवणी– वृशाली विलास गोफणे, अभिमान जालिंदर गोफणे, पळशी– अक्काताई बबन लोखंडे, अर्चना आबासाहेब रणदिवे, लक्ष्मी टाकळी– संदीप औदुंबर मांडवे, अभिजीत हाके, खर्डी– शत्रुघ्न दगडू रणदिवे, अमोल मच्छिंद्र पाटील, सरकोली– शुभांगी प्रविण भोसले, वर्षा दिपक भोसले

या उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. स्थानिक विकास, शेतकरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार असून, पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत पर्याय ठरेल, असा विश्वास आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments