Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातून जिजाऊ जन्मोत्सवास हजारो मराठा बांधव व भगिनी रवाना

 सोलापूर जिल्ह्यातून जिजाऊ जन्मोत्सवास हजारो मराठा बांधव व भगिनी रवाना




 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
सालाबादप्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा  येथे दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. राज्यभरातून तसेच पर राज्यातूनही लाखोंच्या संख्येने 
 सोलापूर जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी रविवारी रवाना झाले आहेत . मराठा सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने याचे नियोजन केले असून जिजाऊ सृष्टीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी जिजाऊ सृष्टी साठी देणगी दिली असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. 
  मराठा सेवा संघाच्या वतीने 12 जानेवारी रोजी 428 वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे साजरा केला जाणार आहे.दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न  होणार आहे.  मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड.  पुरुषोत्तम खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत. 
  स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडविले त्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता यांना श्रद्धास्थानी ठेऊन मराठा सेवा संघ तेहतीस कक्षांच्या माध्यमातून गेली साडे तीन दशकं काम करत असताना गाव पातळीपासून ते अंतर राष्ट्रीय पातळीपर्यंत जिजाऊंच्या विचारांची पेरणी करत आहे. या विचारातून प्रेरित होऊन दरवर्षी अबाल वृध्द, महिला अभिवादनासाठी सिंदखेडराजा येथे गर्दी करतात यंदा देखील सोलापूर शाखेच्या वतीने शहर जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव भगिनी सिंदखेड राजाला रवाना होणार आहेत 
 12 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता महापूजा होणार आहे. सकाळी आठ वाजता भव्य पालखी सोहळा, वारकरीं दिंडी निघणार आहे तर दहा वाजता शिवधर्म ध्वजारोहण कार्यक्रम साजरा केला जाणार आह. साडेदहा ते दीड वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, शाहिरांचे पोवाडे, प्रकाशन सोहळा, विशेष सत्कार सोहळा तसेच राज्य पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा होणार आहे
 दुपारच्या सत्रामध्ये शिवधर्म पिठावर मुख्य कार्यक्रम होणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत यावेळी विचार पिठावर मराठा सेवा संघाचे राज्यभरातील पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी नर्मदा काटकर, रामदास झोळ,अमृत अमृतराव देशमुख,  गंगा कदम  रितेश केरे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. 
 या सोहळ्यात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे वि. अध्यक्ष प्रशांत शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments