आदिवासी कोळी समाजाचा एक फेब्रुवारीला वधू-वर मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर संचलित आदिवासी कोळी समाजाचा १४ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत मुळे सभागृह, हरिभाई देवकरण प्रशाला प्रांगण, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर बटगेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यात समाजाच्या इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या मेळाव्यात आदिवासी कोळी समाजासह समाजाच्या इतर सर्व पोटजातीच्या समाजबांधवांची प्रथम वधु-वर नोंदणी तसेच घटस्फोटीत / घटस्फोटीता, विधूर/विधवा यांची देखिल नोंदणी करण्यात येवून सेवा देण्यात येत आहे. तसेच नुकतेच झालेल्या नगर परिषद व महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे विष्णुपंत कोळी (मुंबई), माजी आमदार प्रकाश यलगुलवार, उज्ज्वला साळुंके इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील, तेलंगाणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील कोळी समाज वधु-वर व पालक उपस्थित राहणार आहेत. कोळी समाजातील गरजू वधु-वर पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव नागनाथ दोरणाळे, खजिनदार शिवलिंग कोळी, शिवपुत्र जमादार, विश्वनाथ बिदरकोटे, हनुमंत मोतीबने, मनीष कोळी आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments