महाराष्ट्र कोर्ट लीगचा बक्षीस वितरण सोहळा जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- पुणे दिघी येथील मोझे विद्यालया जवळील आर.एस.पी. क्रिकेट ग्राउंड (तापकीर ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी कला व क्रीडा मंडळ पुणे व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग -२०२६ चा बक्षीस वितरण सोहळा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी कला व क्रीडा मंडळ पुणे व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ महाराष्ट्र कोर्ट प्रीमियर लीग -२०२६ यांच्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, पुणे जिल्हा न्यायाधीश १ बी.व्ही. वाघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर निकम, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, क्रियाशील सदस्य संदीप फुगे –पाटील पुणे, मध्यवर्ती न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था छ.संभाजी नगर चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लिंबोळे, पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक- सुनेत्रा जोशी, पुणे लघुवाद न्यायालयाचे प्रबंधक रफिक तांबोळी, पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी कला व क्रीडा मंडळ पुणे चे अध्यक्ष योगेश पवार, ज्युडीशियल स्टार पुण्याचे कार्याध्यक्ष - जोतीराम लावंड आदिजन उपस्थित होते.
महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचारी व श्री क्षेत्र अक्कलकोट चे शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, महांतेश स्वामी, गोकुळ पाटील, असद फुलारी हे उपस्थित होते.

0 Comments