Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय येथे तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान संपन्न

 डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय येथे तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान संपन्न




बार्शी (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. संदीप तांबारे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

डॉ. तांबारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना तणावाची कारणे, त्याचे मानसिक व शारीरिक परिणाम तसेच तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक उपाय यांची सविस्तर माहिती दिली. सकारात्मक विचारसरणी, वेळेचे योग्य नियोजन व आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक  मोरे टी. एस., डॉ. रणनवरे ए. वाय ., प्रा. जाधव जी.व्ही., प्रा. शेळके एस. एम., प्रा. आदलिंगे ए. आर. तसेच इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरव एम.डी. यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना मानसिक सशक्ततेची दिशा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments