गुणांच्या सादरीकरणाने उद्दिष्ट गाठता येते- प्रमोद पाटील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मा.ग्रंथालय संचालक मुंबई व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 केंद्र सोलापूरच्या वर्गाचा शुभारंभ रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमोद पाटील तांत्रिक सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,सोलापूर व संजय ढेरे ग्रंथालय निरीक्षक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,सोलापूर संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे ,
कार्यवाह साहेबराव शिंदे, सहकार्यवाह भास्कर कुंभार, मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, वर्ग व्यवस्थापक कुंडलिक मोरे, शिक्षक दत्ता मोरे ,गणेश फंड,वृषाली हजारे, लिपिक दिपाली नरखेडकर, सेवक गीतांजली गंभीरे, सौ विमल ढेरे यांच्यासह वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते आपले अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उत्साह पूर्ण शैलीने आपल्याजवळ असलेल्या गुणांच्या सादरीकरणाने उद्दिष्ट गाठता येते याची खात्री दिली. मनोरंजनात्मक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संजय ढेरे यांनी ग्रंथालय क्षेत्रातील करिअर करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वृषाली हजारे यांनी केले तर प्रास्ताविक अविनाश गायकवाड यांनी केले. उपस्थित सर्वांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद पाटील यांची मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्त केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगणाथन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर आभार दत्ता मोरे यांनी मानले. ग्रंथालय चळवळीचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, माजी विधान परिषद सदस्य नांदेडचे आमदार गंगाधर पटणे यांच्या निधनाची वार्ता दुःखद वार्ता समजल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली.

0 Comments