Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष हरपला,‎ खरंच आमचा‎ बाप‎ माणूस गेला- नगरसेवक किसन जाधव

 महाराष्ट्राचा‎ विकासपुरुष हरपला,‎ खरंच आमचा‎ बाप‎ माणूस गेला- नगरसेवक किसन जाधव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात‎ विकासाचा दूरदृष्टीकोन घेऊन‎ चालणारा, कार्यकर्त्यांच्या‎ पाठीशी‎ खंबीरपणे‎ उभा‎ राहणारा‎ आणि‎ संपूर्ण‎ राज्याला‎ कुटुंब मानणारा नेता आज हरपला आहे.‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्या रूपाने आम्ही केवळ एक‎ नेता नाही,‎ तर‎ आमचा बाप माणूस‎ गमावला आहे,‎ अशी‎ अत्यंत भावनिक प्रतिक्रिया नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ व्यक्त केली‎ बुधवारी‎ सकाळी बारामती‎ विमानतळावर‎ झालेल्या‎ विमान‎ अपघातात‎ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे‎ विद्यमान उपमुख्यमंत्री अजित‎ पवार यांचे‎ दुःखद‎ निधन‎ झाल्याची बातमी‎ समजताच‎ संपूर्ण‎ देशासह‎ महाराष्ट्रात शोककळा‎ पसरली आहे. महाराष्ट्राच्या‎ राजकारणातील‎ एक‎ चाणक्य, दूरदृष्टी‎ असलेला आणि विकासाची घोडदौड अविरत‎ सुरू ठेवणारा‎ नेता‎ काळाच्या‎ पडद्याआड‎ गेला‎ आहे. नगरसेवक किसन जाधव पुढे म्हणाले की, अजित पवार‎ हे केवळ पदावरचे‎ नेते नव्हते,‎ तर कार्यकर्त्यांना‎ बळ‎ देणारे,‎ विश्वास देणारे‎ आणि वेळप्रसंगी कुटुंबप्रमुखासारखी जबाबदारी‎ घेणारे नेतृत्व होते. मी‎ राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीत‎ सक्रिय‎ कार्यकर्ता असताना‎ तसेच सोलापूर जिल्हा नियोजन‎ समितीचा सदस्य‎ म्हणून‎ काम करत असताना,‎ केवळ‎ आणि‎ केवळ‎ अजित‎ पवार‎ यांच्या‎ कृपा‎ व आशीर्वादामुळेच ही जबाबदारी‎ निभावू‎ शकलो.‎ प्रभाग क्रमांक‎ २२ च्या‎ विकासासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.‎ विकासकामांच्या बाबतीत त्यांनी कधीही नकार दिला नाही. एक आपुलकीचा, कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझ्याशी त्यांचे नाते‎ होते.‎ त्यामुळे‎ आज निर्माण‎ झालेली ही पोकळी‎ कधीही‎ भरून निघणार नाही.‎ महाराष्ट्राच्या‎ राजकारणात‎ असा‎ नेता पुन्हा‎ होणार‎ नाही,‎ अशी खंत‎ त्यांनी‎ व्यक्त केली. आज घरातला कुटुंबप्रमुखच‎ हरपल्यासारखं‎ वाटत आहे. त्यांच्या‎ प्रेमावर, विश्वासावर‎ आणि‎ मार्गदर्शनावर‎ आम्ही‎ उभे होतो.‎ त्यांच्या विकासात्मक‎ धोरणांवरच‎ आजपर्यंत काम केलं आणि‎ पुढील काळातही त्यांच्याच‎ दूरदृष्टीच्या विचारांनी‎ काम करत राहू, असे सांगताना किसन‎ जाधव‎ यांचे‎ मन‎ दुःखाने भरून‎ आले.‎ उपमुख्यमंत्री अजित पवार‎ यांना मी‎ खूप‎ जवळून‎ पाहिले.‎ माझ्यावर त्यांचे‎ विशेष प्रेम व विश्वास‎ होता.‎ त्यांचा निष्ठावंत‎ कार्यकर्ता म्हणून‎ मी नेहमी‎ प्रामाणिकपणे काम केले.‎ त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या‎ पाठीशी‎ राहतील,‎ असा भावनिक‎ विश्वासही‎ त्यांनी व्यक्त‎ केला. खरंच,‎ आज आमचा‎ बाप माणूस‎ निघून‎ गेला‎ आहे, अशा‎ शब्दांत‎ त्यांनी आपल्या‎ भावना‎ व्यक्त केल्या. यावेळी‎ जाधव–गायकवाड आणि‎ इछा भगवंताची‎ परिवाराच्या वतीने‎ दिवंगत‎ उपमुख्यमंत्री अजित पवार‎ यांना‎ भावपूर्ण‎ श्रद्धांजली अर्पण करण्यात‎ आली.‎

Reactions

Post a Comment

0 Comments