Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं - चेतनसिंह केदार सावंत

 राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं - चेतनसिंह केदार सावंत




सांगोला (कटूसत्य वृत्त):- अजितदादा पवार हे राज्याचे अभ्यासू आणि स्पष्टवक्ते प्रशासनावर फकड असलेलं नेतृत्व होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपले असून महाराष्ट्राचे मोठं नुकसान झालं आहे. राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यास असणारं नेतृत्व हरपलं अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली.
      राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळावर बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस असून राज्याची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजितदादा अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व होतं. ज्या वेळी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असताना अशा काळात त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनिय मनाला चटका लावणारं आहे. “मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड असलेला नेता होता. बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारा नेता राज्याने गमावला अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments