Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण



 

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

              यावेळी अप्पर जिल्हाधिकारी  गणेश निऱ्हाळीनिवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटीलप्रांत अधिकारी सदाशिव पडदुणेउपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोडजिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडेअन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळेयांच्या सह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

             प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना तंबाखूमुक्ती तसेच कुष्ठरोग मुक्त बाबत शपथ दिली. प्रारंभी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments