राजकीय, सामाजिक, जातीय सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टीने पत्रकारांचे काम- मालोजीराजे देशमुख
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- राजकीय, सामाजिक कार्यातील आपल्या बातम्या पाहून काम करण्याची प्रेरणा आम्हाला नेहमीच आपल्याकडून मिळत गेली. एस. एन. डी. स्कूल मध्ये विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही जे उपक्रम राबवतो त्याच्या बातम्या आपल्या दैनिकातून प्रसारित केल्याने एस. एन. डी. स्कूलचे नाव जिल्ह्यात, तालुक्यात मोठे करण्यात पत्रकारांचा हातभार असून राजकीय, सामाजिक, जातीय सलोखा अबाधित राहण्याच्या दृष्टीनेही पत्रकारांचे मोठे काम असल्याने दक्षता बाळगून बातमीदारी करत असल्याचे मत एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल व रेणुका परिवार यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते.यावेळी एस. एन. डी. स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, अँड. रणवीर देशमुख धनाजीराव देशमुख, सेक्रेटरी रोहित शेटे, शक्ती पलंगे यांच्या शुभहस्ते पत्रकार सुनील राऊत, आनंद जाधव, उमेश पोतदार, अभिजीत म्हामणे, अभिमन्यू आठवले श्रीकांत बाविसकर सुनील गजाकस विलास भोसले समीर सोरटे प्रमोद शिंदे मनोज राऊत यांना फेटा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार विलास भोसले, सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर, प्रमोद शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संदीप पानसरे यांनी केले असून सूत्रसंचालन व आभार पीआरओ मनोज राऊत यांनी मानले.

0 Comments