Hot Posts

6/recent/ticker-posts

संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन

 संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- संग्राम नगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कॉलनीस ‘जिजाऊ नगर’ असे नामकरण करण्यात आले असून, या कॉलनीचे भव्य उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक माननीय सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे झाली. जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी जिजाऊंच्या विचारांचा व समाजघडणीत त्यांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्या म्हणाल्या की,
“‘जिजाऊ नगर’ हे नाव केवळ एका कॉलनीचे नसून प्रेरणादायी विचारांचे प्रतीक आहे. जिजाऊंनी दिलेले संस्कार, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची शिकवण या नावातून प्रतिबिंबित होते. महिलांच्या सन्मानाचे व सक्षमीकरणाचे प्रतीक असलेले हे नाव समाजात नैतिक मूल्ये रुजवण्याचा संदेश देते. भावी पिढीसाठी आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून देणारे आणि परिसराला ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळख देणारे हे नाव सदैव अभिमानाने उच्चारले जाईल.”

संग्राम नगर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय अजित रेवंडे यांनीही मनोगत व्यक्त करत जिजाऊंच्या जीवनकार्यावर विचार मांडले, ग्रामपंचायतीविषयी माहिती दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास संग्राम नगरचे सरपंच अजित रेवंडे, उपसरपंच राचकर, प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख माननीय अमोल शिवाजी जगदाळे, युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्यासह सचिन गायकवाड, समर्थ जगदाळे, राजू सोनवणे, अनिल कदम, माने, शहाजी वाघ, डॉ. संतोष काटकर, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. विशाल साळुंखे, अभिजीत वाघ, आकाश मुंजाळ, गणेश कदम, सचिन लोखंडे, सतीश रेवंडे, बबन शेंडगे, हनुमंत रेवंडे, गुणवंत अंधारे, सुमंत अंधारे, राजेश कांबळे, सावंत, जाधव, शकील भाई दस्तगीर, जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष सौ. सुषमा पाटील, सौ. पल्लवी काटकर, सौ. विद्या मुंगुसकर, सौ. विद्या साळुंखे, सौ. मनीषा कदम, सौ. विनोदिनी अंधारे, सौ. वाघ, कु. उज्वला आडणे, सौ. रेशमा ननवरे, सौ. देशमुख आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोलशेठ जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू सोनवणे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments