Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा शै.कला शिक्षक संघाचा जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

 सोलापूर जिल्हा शै.कला शिक्षक संघाचा जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कला शिक्षक संघ शैक्षणिक कला शिक्षक सोलापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार, आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, कलाप्रेमी पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धांचा बक्षिस वितरणाचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे व विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शेरशाह डोंगरी यांनी अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, “कला शिक्षक हे समाजाच्या सांस्कृतिक विकासाचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी शैक्षणिक कला संघटनेच्या वतीने माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांना कला शिक्षकांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या मागण्यांमध्ये पुढील प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता –
१) कला शिक्षकांची नियुक्ती करताना विद्यार्थी पट संख्या पूर्वी प्रमाणे विचारात घ्यावी.
२)  शासकीय रेखाकला परीक्षा,  मूल्यमापन प्रक्रिया व निकाल  याच्या पद्धतीत सुधारणा करणे.
३) शासकीय रेखाकला परीक्षा - एलिमेंटरी व इंटरमिजिएट साठी सोलापूरात स्वतंत्र मूल्यमापन केंद्र मिळावे.
या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांनी दिले.
कार्यक्रमात कला क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ कलाशिक्षकांना कला शिक्षक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जीवनगौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक व कलाप्रेमी पुरस्कार प्राप्त कला शिक्षकांची नावे
सोलापूर जिल्ह्यातून ज्ञानेश्वर निवृत्ती कांबळे (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांना जीवनगौरव पुरस्कार तर महेश सूर्यकांत छत्रबंद , सुवर्णा मल्लिनाथ भुसने , शोभा सोमनगौडा बिरादार , नागराज चंद्रकांत रमणशेटटी यांना जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२६ व नंदकुमार चंद्राम विजापूरे, विजया अजिंक्य मोरे ,  गीता तायप्पा पवार , सुनिता किसन घाडगे  ,मधुरा मिलिंद छत्रे  यांना कलाप्रेमी पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले. संघटनेच्या वतीने विशेष पुरस्कार म्हणून जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले सर यांना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम, मा. दत्तात्रय सावंत, (माजी शिक्षक आमदार, विभाग पुणे.), मा. पंडित भिमण्णा जाधव, (आंतरराष्ट्रीय सुंद्रीवादक) प्राचार्य राम अप्पाराव ढाले, (एस. व्ही.सी.एस. हायस्कूल, भवानी पेठ, सोलापूर), मा. शांतय्या गुरय्या स्वामी, (सचिव, श्री बृहन्मठ होटगी संस्था, सोलापूर) मा. सुधीर बसवंत भरले,   प्राचार्य नितीन झाडबुके, (बसवेश्वर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय निंबर्गी), मा. शेरशहा डोंगरी, (राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ) जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले , सचिव  संतोष धारेराव शांताप्पा काळे, अध्यक्ष शेरशहा डोंगरी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सदर उपक्रमामुळे कला शिक्षणाला चालना मिळून कला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जगदीश बिडकर, विजयश्री गंगदे, सचिन व्हनमाने, संदिप पोतदार,  नागनाथ गावडे, सचिन कोरे, पंडित स्वामी, संदिप स्वामी, शैलेश स्वामी, आकाश नंदुर, सिद्धाराम नालवार, मोहन कांबळे,राजा उबरजे राजेंद्र यंदे, योगेश हिरेमठ, मदगोंडा बिराजदार, षण्मुखानंद दाते,दिलीप दीक्षित, सुवर्णा भुसने, विजयश्री बिराजदार, मधुरा देशपांडे, स्वाती साठे, जगदेवी वर्मा,  स्नेहल गुंगे,  सोमशंकर म्हेत्रे, महालिंगप्पा सोमेश्वर  नरेंद्र नालवार, शशिकांत मोटगी, अनिल रॉय, तेजप्पा बिराजदार शै. कला शिक्षक संघ सोलापूरचे सर्व कार्यकारणी, सदस्य सर्वांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कल्लाप्पा साळुंखे यांनी केले तर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन स्वाती साठे मॅडम यांनी केले.शेवटी सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी पालक व सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार शांतप्पा काळे यांनी मांडले.

Reactions

Post a Comment

0 Comments