कळंब मध्ये वैकुंठ एकादशी उत्सव उत्साहात साजरा !
कळंब(कटूसत्य वृत्त):- येथील श्री बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशीचा उत्सव दि . ३० डिसेंबर मंगळवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. तिरुपती बालाजी प्रमाणे भगवान व्यंकटेश चे विविध उत्सवाने वातावरण भक्तीमय झाले.आपल्याकडे जी पुत्रदा एकादशी म्हणली जाते तिलाच दक्षिण भारतात वैकुंठ एकादशी या नावाने संबोधले जाते. तिरुपती येथे वैकुंठ एकादशी दरम्यान केवळ पास धारकांनाच दर्शन दिला जातो,बाकी इतर सर्वदर्शन या काळात बंद असतात .
सकाळी देवाचा भव्य अभिषेक व आरती करून भजन,नामस्मरण,व्यंकटेश स्तोत्र पठण करण्यात आले.सायंकाळी श्री बालाजी,भूदेवी व श्री देवी यांची आकर्षक पालखीमध्ये सजावट करून मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यात आल्या. या दिवशी मंदिराचे मुख्य द्वार बंद होते व वैकुंठ द्वार मधून प्रवेश करून दर्शन देण्यात आले..वैकुंठ एकादशीला वैकुंठ द्वारातून श्री वेंकटेशाचे दर्शन घेतल्यास वैकुंठप्राप्ती (मोक्ष )प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे विष्णू पुराणानुसार, भगवान विष्णूंनी दोन राक्षसांसाठी वैकुंठाचे द्वार उघडले, कारण त्यांनीही असा वर मागितला होता की, जो कोणी त्यांची कथा ऐकेल आणि वैकुंठ द्वार नावाच्या त्या दारातून बाहेर येणाऱ्या भगवान विष्णूंची प्रतिमा पाहिल, त्याला वैकुंठ प्राप्त होईल. म्हणूनच, असा विश्वास आहे की या दिवशी विष्णू मंदिरे भक्तांना वैकुंठ द्वारातून जाण्यासाठी एक द्वार तयार करतात..
या उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक फुलाद्वारे सजावट करण्यात आली. सायंकाळच्या प्रदक्षिणा आणि आरतीच्या समयी भाविकांची गर्दी आणि उत्साह उल्लेखनीय होता.
चौकट
साक्षात तिरुपतीप्रमाणेच कळंब येथील श्री बालाजी मंदिरात उत्सव साजरे होत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.. श्री.राम प्रपन्नाचार्य रामानुजा आचार्य मुख्य पुजारी बालाजी मंदिर संस्थान कळंब
.jpg)
0 Comments