दरोडा टाकण्याचे तयारीत असणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड !
कळंब शहरासह परिसरात मोठी खळबळ .
कळंब (कटूसत्य वृत्त):- येरमाळा व कळंब हददीत हायवेवरून जाणारे वाहनांची आडवुन लुटमार होण्याचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना कळंब ते केज जाणारे रोडचे बाजुस कळंब शहरातील व्दारकानगरीचे जवळ बंद असलेल्या पेट्रोलपंपामध्ये दोन पिकअप वाहन व काही इसम थांबलेले दिसले पथकाचे वाहनास पाहुन काही इसम तेथुन पळण्याचे तयारीत असताना त्यांना पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागेवरच पकडले. त्या सर्वांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तेथे थांबण्याचे कारण व नावाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे याप्रमाणे चंदर भास्कर काळे सुभाष ऊर्फ हरी भास्कर काळे शामसुंदर बिभीषण काळे रा. कन्हेरवाडी पाटी ता. कळंब नवनाथ अनिल शिंदे राहुल अनिल शिंदे रा.लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी बालाजी माणिक काळे शिराढोण दत्ता हिरा पवार रा.लोहटा पुर्व ता. कळंब असे सांगीतले त्यांनी सांगीतलेले नावाबाबत पथकास संशय वाटल्याने त्यांची माहिती घेतली असता त्यांचेवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे दिसले त्यांचेवर जास्त संशय वाढल्याने पथकाने पंचासमक्ष सदर दोन पिकप वाहनाची पाहणी केली असता आतमध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य एक लोखंडी धारदार तलवार, एक स्टील चा रॉड, 04 मोबाईल मिळुन आले पिकअप वाहनासह एकुण १०,८९,000/- रू.चा मुददेमाल जप्त करुन वरिल आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कळंब येथे गुरनं ४/२०२६ कलम ३१०( ४), ३१० (५) बीएनएस सह कलम ४,२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नमुद आरोपीतांचे अभिलेखाची पाहणी केली असता त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी असे मालाविषयी चे गंभीर गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . विनोद इज्जपवार व त्यांच्या टीमने केली आहे या धाडसी कारवाईमुळे कळंब शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

0 Comments