Hot Posts

6/recent/ticker-posts

जनकल्याण अर्बन को-आँप बँकेच्या वतीन नूतन नगराध्यक्षासह नवनिर्वाचित नगरसेकांचा भव्य सत्कार करण्यात आला.

 जनकल्याण अर्बन को-आँप बँकेच्या वतीन  नूतन नगराध्यक्षासह नवनिर्वाचित नगरसेकांचा भव्य सत्कार करण्यात आला.



             कळंब (कटूसत्य वृत्त):- येथील जनकल्याण अर्बन को-आँप बँकेच्या वतीने गुरवार (दि.१) रोजी नगराध्यक्षासह नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी  जनकल्याण अर्बन को-आँप बँकेचे संस्थापक अध्यक्ष .उमेशराव कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्ताविकात सामाजिक, राजकीय, अर्थिक क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या मांन्यवरांचा सन्मान करण्याची परंपरा जनकल्याण अर्बन को -आँप बँकेच्या माध्यमातून बँकेच्या स्थापनेपासून जपत आलेलो आहोत.सत्कार समारंभामध्ये   नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई शिवाजी कापसे यांच्यसह नगर सेवक  शितल रामचंद्र चोंदे , रोहन राजेश पारख,लखन बळीराम गायकवाड, हर्षद धंन्यकुमार अंबुरे,अमरबीन चाऊस,अतुल भगवानराव कवडे,शाला शिवा पवार, भूषण भारत करंजकर,तसेच योजना अनंत वाघमारे यांचाया वेळी सन्मान केला .या कार्यक्रमासाठी जनकल्याण अर्बन बँकेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी, बकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजय सांजेकर,जनकल्यान अर्बनचे संचालक संदीप बावीकर,महेश जोशी, राजाभाऊ दीक्षित, आशोक शिंपले तसेच शिवसेनेचे अजित पिंगळे,कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती शिवाजी कापसे, भाजपाचे कळंब पूर्वचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंके,भाजपाचे कळंब पश्चिमचे तालुकाध्यक्ष अरूण चौधरी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनंत वाघमारे,शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रणव चव्हाण, संतोष कस्पटे, भाजपचे  मेघराज देशमुख,राजेद्र मिटकरी आदी उपस्थित होते . 

Reactions

Post a Comment

0 Comments