भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात, पाचजण जखमी, एक गंभीर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 6, 2026

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात, पाचजण जखमी, एक गंभीर!

 भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात, पाचजण जखमी, एक गंभीर!
   


  
    मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळजवळ सोमवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून, पाचजण जखमी झाले आहेत.   मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच ४६- बीयू ५४०८) मोडनिंबवरून सिद्धेवाडीकडे जात असलेल्या दुचाकीला (एमएच १३- व्ही ६०३९) पाठीमागून जोरदार धडक दिली.   यात डोक्याला जबर मार लागून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला, तर कारमधील अन्य पाचजण किरकोळ जखमी झाले.
अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार युवराज बजरंग शिंदे (वय ५५, रा. सिद्धेवाडी, ता. मोहोळ) यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. कारमधील किरकोळ जखमी झालेल्या पाचजणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. सरवदे यांनी उपचार करून त्यांना कळंबोली येथे पाठविले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक व मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील कार आणि दुचाकी क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसांत झाली असून, तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
कारमधील जखमींची नावे
मच्छिंद्र नागनाथ नागरगोजे, सविता वामन खाडे (दोघेही रा. कळंबोली), दक्ष बाळू मगर निर्मला बाळू भगत, देवांश बाळू भगत (तिघेही रा. पनवेल) अशी जखमींची नावे आहेत. मच्छिंद्र नागरगोजे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages