फडणवीसांच्या टीकेला उत्तर; मोफत बस व मेट्रो प्रवास अंमलात आणू – अजित पवार
पुणे (कटूसत्य वृत्त):- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मोफत बस व मेट्रो प्रवासाचे आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “‘खिशात नाही आणा, आणि बाजीराव म्हणा’” असे टीका केले होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले, “होय, मला खुद फडणवीसांनी बाजीराव म्हटले. बाजीराव हे पराक्रमी होते. आम्ही मोफत बस व मेट्रो प्रवासाचे आश्वासन दिले आहे आणि त्याची अंमलबजावणी करून दाखवू.”
अजित पवारांनी सांगितले की, पुण्यात आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात मोफत प्रवासाची हमी दिल्यानंतर भाजपसह इतर पक्षांनी टीका केली. त्यावेळी फडणवीस यांनी सभा दरम्यान “‘उठा अलार्म बंद करा’” असे विधान केले होते. यावर पवारांनी उत्तर दिले की, “अलार्म वाजेल, मतदान केंद्रावर जाताना घड्याळ नेता येणार नाही, पण घड्याळ चिन्हावर मतदान नक्की होईल.”
पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जाहीरनाम्याची व्हिडीओ क्लिप दाखवून स्पष्ट केले की, ते राज्याचे ११ वेळा अर्थमंत्री राहिले आहेत आणि आर्थिक नियोजनाबाबत पूर्ण माहिती आहे, त्यामुळे मोफत प्रवासाची अंमलबजावणी करण्यास कोणतीही शंका नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, “महापौर आमचाच होईल, त्यामुळे भाजपची सोबत घेण्याची गरज नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी येण्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी ठरवावे. राज्यातील महायुती अभेद्य आहे, हे खुद फडणवीसांनीच मान्य केले आहे,” असेही अजित पवारांनी म्हटले.
0 Comments