प्रभाग २२ मध्ये नागरिकांच्या मतांवर आधारित विकासावर भर- किसन जाधव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकासकामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक व विचारपूर्ण चर्चा होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड व सौ. चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा, घरोघरी भेटी व गाठीभेटींच्या माध्यमातून गुरुवारी धोंडीबा वस्ती रामवाडी अंबाबाई मंदिर परिसर येथील मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या अपेक्षा, समस्या व सूचना जाणून घेत आहेत. याप्रसंगी राजू जाधव, दीपक जाधव लॉन्ड्री, कैलास हटकर, समीर सिकंदर शेख, अंकुश गायकवाड, फिरोज पठाण, शहानवाज कवठेकर आदींची उपस्थिती होती.
प्रभागात आतापर्यंत मूलभूत सुविधांसोबतच स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, महिलां व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण तसेच सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत. गेल्या दोन दशकांपासून प्रभागाच्या विकासाशी संबंधित असलेल्या नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा यंदा सौ. अंबिका गायकवाड पुढे नेत असून त्यांच्या संपर्क मोहिमेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आम्ही विकासाची आश्वासने देण्यापेक्षा नागरिकांना नेमका कोणता विकास हवा आहे, हे प्राधान्याने जाणून घेत आहोत. नागरिकांच्या सूचनांनुसारच पुढील काळात प्रभाग २२ च्या विकासाची दिशा ठरवली जाईल, असे मत उमेदवार किसन जाधव यांनी व्यक्त केले. यापुढील काळात प्रभागासाठी दीर्घकालीन, नियोजनबद्ध व सर्वसमावेशक विकास आराखडा राबविण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केला आहे. तसेच ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक संस्थापक लक्ष्मण जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वात ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी देखील प्रचारादरम्यान आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवीत मतदारांपर्यंत जाऊन भाजपाच्या चारही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करीत आहेत. प्रचाराचा वेग पाहता चारही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
.jpg)
0 Comments