सत्तेसाठी भाजपकडून जीव घेण्याचे कटकारस्थान – खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असून, आता निवडणुका जिंकण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे, असा गंभीर आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला. पैसा आणि सत्ता अपुरी पडल्यावर भाजपने कार्यकर्त्यांच्या रक्तावर राजकारण करण्याचा मार्ग स्वीकारला असल्याचा घणाघाती हल्लाबोल त्यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची शुक्रवारी निर्घृण हत्या झाली होती. या रक्तरंजित राजकारणाच्या निषेधार्थ रविवारी पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध राजकीय पक्षांच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माकपचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी अध्यक्ष भारत जाधव, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जितेंद्र टेंभुर्णीकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांच्यासह प्रशांत इंगळे, प्रताप चव्हाण, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, प्रमिला तुपलवंडे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, व्यंकटेश कोंगारी, दत्ता गणेशकर, नलिनी कलबुर्गी आदी उपस्थित होते.
मूक आंदोलनानंतर बोलताना खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या, “लोकशाही आणि संविधानाची सातत्याने पायमल्ली होत आहे. या अन्यायाविरोधात आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी भाजपच्या राक्षसी प्रवृत्तीविरोधात आमची लढाई सुरूच राहणार आहे.”
.png)
0 Comments