श्री विठ्ठल कारखान्यावर मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न
वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी मजूरांची वैद्यकीय तपासणी करणेबाबत साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार श्री विठ्ठल कारखाना, श्री विठ्ठल सर्व सेवा संघ यांचे वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २७.१२.२०२५ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेमध्ये आपले कारखान्यामध्ये सन २०२५ - २६ हंगामात ऊस तोडणी मजूराकरिता सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरादरम्यान क्षयरोग, कुष्ठरोग, रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, ई.सी.जी. अस्थीरोग व स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासणी करुन त्यावरील उपचार मोफत करणेत आले. सदर शिबीराचे उद्घाटन श्री विठ्ठलाचे प्रतिमेचे पुजन करून डॉ. ऋतुजा तरळगट्टी, वैद्यकिय अधिकारी, आरोग्य केंद्र, रोपळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत (आबा) पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधीलकी जपत ऊस तोडणी मजूरासाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केलेले आहे. चालु सिझनमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील गटामध्ये व गांवामध्ये फिरते पथकामार्फतही ऊस तोडणी मजूरांची तपासणी करुन औषधोपचार करणार आहोत. तरी सर्वांनी तपासणी करुन घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्यशेती अधिकारी ए. व्ही. गुळमकर यांनी केले.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा तरळगट्टी, गुरसाळे उपकेद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गुटाळ मेंढापूर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देवकते, भोसे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द नाईकनवरे, अजोती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पुजा पवार, जनरल फिजीशन डॉ. सौरुप साळुंखे, प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, उपकेंद्र गुरसाळे यांचा सर्व स्टाफ व आशा वर्कर तसेच कारखान्याचे फिल्ड स्टाफ यांनी शिबीर यशस्वीपणे पार पाडणेसाठी परिश्रम घेतले. या शिबीरामध्ये एकुण ११० मजूर व स्त्री मजूर यांची तपासणी करणेत आली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक व शेती कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय नरसाळे, संचालक कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, सिध्देश्वर बंडगर, अंगद तात्या चिखलकर, विठ्ठल रणदिवे कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
0 Comments