Hot Posts

6/recent/ticker-posts

राजश्री जगन्नाथ मोरे यांना आदर्श माता पुरस्कार

 राजश्री जगन्नाथ मोरे यांना आदर्श माता पुरस्कार




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे यांच्या मातोश्री राजश्री जगन्नाथ मोरे यांना लक्ष्मीबाई फडतरे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास शिवप्रसाद उद्योगसमूहाचे अध्यक्ष शरदबापू मोरे, माजी जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई मोरे, माजी आमदार यशवंत तात्या माने, नीता माने, नेअर डिलाईटचे चेअरमन अर्जुन देसाई, पोलिस अधिकारी प्रकाश जगदाळे, उद्योगपती गणेश झगडे, श्री पारगे तसेच फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, सीईओ जय फडतरे, हनुमंत फडतरे, डॉ. शैलजा फडतरे, उज्ज्वला फडतरे, संगीता फडतरे, कल्याणी फडतरे, डॉ. सोनाली देशमुख, डॉ. विपुल निंबाळकर, डॉ. प्रवीण उत्तेकर, मुख्य लेखापाल मोनिका आखाडे आदी उपस्थित होते.


चौकटीत :

आई म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी सोबत करणारी शक्ती. स्वतःच्या इच्छा, स्वप्नं आणि थकवा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी झटणारी आई म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाचं रूप.मातोश्री राजश्री जगन्नाथ मोरे यांनी प्रेम, शिस्त, संस्कार आणि कर्तव्यनिष्ठा यांचा सुंदर समतोल साधत कुटुंब घडवलं.कधी कठोर तर कधी मायेची सावली बनून त्यांनी मोरे परिवारास योग्य दिशा दिली.आदर्श माता पुरस्कार हा केवळ सन्मान नसून,त्यांच्या आयुष्यभराच्या सेवाभावाची, संस्कारांची आणि ममतेची पोचपावतीच

अध्यक्ष शरद (बापु) मोरे ( शिवप्रसाद उद्योग समूहाचे )
Reactions

Post a Comment

0 Comments