Hot Posts

6/recent/ticker-posts

वरवडे येथे सोमनाथ मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

 वरवडे येथे सोमनाथ मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक व सामाजिक गरजा लक्षात घेऊन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी सन २०२५-२६ मधून वरवडे येथील पवार वस्तीवरील श्री सोमनाथ मंदिर सभामंडपाच्या कामास मंजुरी देण्यात आली असून, सदर कामाचे भूमिपूजन आज माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील व आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, रणदिवे सर, सुरजभैया देशमुख, विनंती ताई कुलकर्णी, माणिक लांडे, सोमनाथ गायकवाड, अजित पाटील, आकाश पाटील, मोहन जगताप, जनार्दन पवार, जगदीश पवार, महेश गायकवाड, भारत गायकवाड यांच्यासह परिसरातील असंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

धार्मिक स्थळांच्या विकासासोबतच ग्रामीण भागातील सामाजिक एकोपा अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने आमदार अभिजीत आबा पाटील सातत्याने निधी उपलब्ध करून देत असून, श्री सोमनाथ मंदिर सभामंडपामुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना एक भक्कम व्यासपीठ मिळणार आहे. विकासाच्या माध्यमातून जनतेशी नाळ घट्ट ठेवण्याचे काम आमदार अभिजीत आबा पाटील करत असून, भविष्यातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments