अमोल बापू शिंदे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, युवानेते अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे व मनिषा कणसे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा भव्य पदयात्रेने करण्यात आला. या पदयात्रेस युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
थोरला मंगळवेढा तालीम येथे श्री गणेश पूजनाने पदयात्रेची सुरुवात झाली. या पदयात्रेत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती तसेच अंगीकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक, थोरला मंगळवेढा तालीमचे सदस्य, संकेत परिवार व अमोल बापू शिंदे मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ही पदयात्रा पिंपळा मारुती नवजवान गल्ली, माळी गल्ली, काळी मशीद, बाजीअण्णा मठ, पत्रा तालीम, सळई मारुती, गवंडी गल्ली, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, कुंभारवाडा, पंजाब तालीम व चौपाड या भागांतून मार्गक्रमण करत गेली.
रॅलीदरम्यान विविध ठिकाणी अमोल बापू शिंदे व सर्व उमेदवारांचे औक्षण करून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. पुष्पहार, पुष्पगुच्छ व पेढे भरवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. “एकनाथ शिंदे जिंदाबाद”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आपण केलेल्या विकासकामांची पावती सुज्ञ मतदार राजा नक्कीच देईल, तसेच लाडक्या बहिणी ठामपणे आपल्या पाठीशी उभ्या राहतील, असा विश्वास अमोल बापू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. युवक व महिलांकडून रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या पदयात्रेत ज्ञानेश्वर सपाटे, संकेत भाऊ पिसे, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित कणसे यांच्यासह शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0 Comments