ग्रेस टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून हज यात्रेची सेवा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील मेसर्स ग्रेस टुर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे हज यात्रेबाबत सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती इम्तियाज इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन 2004 पासून आम्ही भारत सरकारचे मिनिस्टरी ऑफ मायनॉरेटीज वेल्फेअर, गव्हरमेंट ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत आहोत. इस्लाम धर्मामध्ये हज ही एक धार्मिक विधी आहे. जी व्यक्ती सर्व बाबतीत सक्षम आहे, त्यांना हज करणे बंधनकारक आहे.
आपल्या देशात सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर हजला जाण्याची प्रथा व पध्दत आहे. त्यामुळे इतरांसोबत वयोवृध्दांचे प्रमाण हज यात्रेला जास्त असते. अश्या हाजींना आमच्या दुर मार्फत अनुभवाच्या आधारे योग्य नियोजन करुन विविध स्वरुपाची सेवा दिली जाते.
हज यात्रेतील पाच दिवसीय कार्यक्रमात मक्का, मिना, अरफात, मुजदलफा, मक्का व मदिना येथे हाजींना त्रास होवू नये, म्हणून जवळच्या ठिकाणी राहण्याची सोय केली जाते. मूळ मिना अरफात व मुजदलफा ह्या ठिकाणी आमचे 32 वर्षे सऊदी मध्ये राहण्याच्या अनुभव, अरबीचे बोलण्याचे ज्ञान, प्रभूत्व असणारे चालक इम्तीयाज इनामदार याने योग्य वेळेस विधी पार पाडण्याचे नियोजनानुसार प्रत्यक्ष सहभागी होवून पार पाडल्या जातात. हाजींना शासकीय कागदपत्रांची पूर्तता व हज यात्रे दरम्यान येणाऱ्या सर्व अडचणी वेळेस प्रत्यक्ष सहभागी होवून अडचणीचे निवारण केले जाते.
भारत सरकार व सौदी सरकारकडून हज यात्रेला आमच्या लोकांना कागदपत्राची पूर्तता करण्याची शेवटची तारीख दिनांक 15 जानेवारी 2026 आहे.
भारत सरकारकडून आमच्या ट्रॅव्हल्सला 80 व्यक्तींचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. मिना येथे आमचे ट्रॅव्हल्सचा झोन क्रं.4-डी कॅटेगिरी मंजूर केलेली आहे. सोलापूरात भारत सरकारकडून मान्यता प्राप्त व सौदी सरकारशी संलग्न अशी रजिस्टर्ड ट्रॅव्हल्स आहे. हज यात्रेची बुकिंग आमच्या ट्रॅव्हल्सला करुन सेवा करण्याची संधी द्यावी, असेही इनामदार म्हणाले.
.png)
0 Comments