बिनविरोध ६७ विजयी उमेदवार रडारवर
चौकशी होणार, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या आधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या विविध भागांतून तब्बल ६७ उमेदवारांनी आपली जागा बिनविरोध जिंकली आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव अर्ज बाद झाल्यामुळे या उमेदवारांचा विजय सुकर झाला. मात्र आता विजयी नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत.
मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
केडीएमसीत भाजपचे 14 व शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार, तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथे किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल (एस) व आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचीही चौकशी होणार आहे.
आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड 'ए' कार्यालयातील CCTV फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद नाही. 2 जानेवारी (नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख) नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील.
निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली अजून आतापर्यत भाजपाचे 45 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

0 Comments