Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथे वकिलावर झालेल्या हल्ल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला

 टेंभुर्णी येथे वकिलावर झालेल्या हल्ल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला





- टेंभुर्णी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर ?

- IPS अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी बळावली

- सोलापूर ग्रामीण एसपी अतुल कुलकर्णी यांची कायदा–सुव्यवस्था अपयशी ?

टेंभुर्णी (अनिल जगताप):- टेंभुर्णी येथे वाळू माफियांच्या वकिलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तसेच भारत नाना पाटील यांच्यावर भर चौकात ऑइल ओतण्याच्या गंभीर घटनेनंतरही  गुन्हेगारांवर वचक बसवण्यात टेंभुर्णी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. करमाळा विभागाचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक (IPS) अंजना कृष्णा आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या कार्यक्षेत्रात अवघ्या महिन्याभरात आता कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्याने कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात गुन्हेगारांचे मनोबल वाढले असल्याची सर्वसामान्य नागरिकांतून चर्चा होत आहे

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव बुद्रुक  डायल 112 वरून आलेल्या मदतीच्या कॉलनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे यांच्यावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा, मारहाण व खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमांखाली तिघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे हे  डायल 112  ड्युटीवर असताना महादेव तुपसौंदर (रा. अकुंबे, ता. माढा) यांनी दोन इसमांकडून मारहाण झाल्याची माहिती देत स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानुसार शेटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता आलेगाव बुद्रुक येथील भिमानगर रोडलगत शेटे हे कॉलरशी बोलत असतानाच ग्रे रंगाची विटारा ब्रिझा भरधाव वेगाने आली. गाडीतून उतरलेल्या तीन इसमांनी पोलिस गणवेश पाहताच वाद घालण्यास सुरुवात केली.

शासकीय कर्तव्य बजावत असल्याचे सांगित्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाले. तिघांनी मिळून शेटे यांची गच्ची पकडून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. एकाने दगडाने डोक्यावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. “या पोलिसाला जिवंत सोडायचे नाही,” अशी धमकी देत हल्ला करण्यात आला.

नागरिकांनी प्रसंगावधान राखून हस्तक्षेप केल्याने शेटे यांचा जीव वाचला. गर्दी वाढताच आरोपी गाडीसह फरार झाले.
जखमी पोलिस कॉन्स्टेबल शेटे यांच्यावर मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे उपचार करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून
रविंद्र रामचंद्र चंदनकर,
रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगाव बुद्रुक, ता. माढा)
आणि रामचंद्र चंदनकर यांचा जावई
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत असून आरोपींच्या अटकेसाठी दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मात्र वेळोवेळी गुन्हे गारावर वचक ठेवण्यासाठी प्रयत्न गरजेचे होते कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपारची यादी जाहीर करून बोटावर मोजतील इतक्यांना तडीपार करण्यात आले अनेक अवैधरित्या धंद्या वरच्या पैशावर उड्या मारून गुन्हेगार प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता तर आज वकील, पोलीस यांच्यावर कधी हि वेळ आली नसती अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांत होत आहे अनेक गुन्हे दाखल असून सुद्धा गुन्हेगार अद्याप अटक नसल्याचे ही चर्चा आहे याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कडक अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे अन्यथा एक दिवस जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
********
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीसावरती गेल्या पाच वर्षांपासून झालेल्या हल्ल्याचा तपशील
*********
१)आलेगाव येथील घडलेल्या  “सरकारी कर्तव्य बजावत असताना पोलिसावर हल्ला करणाऱ्यांना आरोपी यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी दोन पोलीस पथक तैनात करण्यात आली आहे”
 नारायण पवार, पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी
********फोटो घेणे****

२) करमाळा विभागाचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक (IPS) अंजना कृष्णा यांच्या कार्यक्षेत्रात  वेगवेगळे गुन्हे व  वाळू माफियांसह संबंधित अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.
********
३) 2022 मध्ये गारआकोले येथे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस देशमुख–माने व सहकाऱ्यांवर वाळू माफियांनी वाहन घालण्याचा प्रयत्न केला होता.
********
4) टेंभुर्णी शहरात गुन्हाची चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून सरकारी वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी यापूर्वी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
********
5) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या जिल्ह्यात महिन्याभरात दोन गंभीर घटना घडतात, हे कायदा–सुव्यवस्थेचे अपयश मानले जात आहे.
*********
Reactions

Post a Comment

0 Comments